Saturday , August 15 2020
Home / महत्वाच्या बातम्या / आगरदांडा जेटीवर मच्छीमार करणार आंदोलन

आगरदांडा जेटीवर मच्छीमार करणार आंदोलन

मुरुड : प्रतिनिधी – 1 ऑगस्ट रोजी मासेमारी करण्यास शासनाने परवानगी दिल्याने मुरुडच्या मच्छिमाराने आपल्या बोटी आगरदांडा जेटीला लावल्या तत्काळ मेरीटाईम बोर्डाच्या अधिकार्‍यांनी त्यांना बोटी लावण्यास मनाई केली. शासनाचे आदेश घेऊन या मग जेटी वापरा असे सांगितल्याने मच्छिमार संतप्त झाले. जेटीवर एकत्र येऊन 4 आगोस्टला मंगळवारी याच जेटीवर हजारो मच्छिमार एकत्र होऊन जेथपर्यंत मच्छिमारांना जेटी वापरण्याची परवानगी मिळत नाही तो पर्यंत हजारो कोळी बांधव जेटीवर ठिय्या आंदोलन करणार अशी माहिती मुरुड तालुका मच्छिमार संघाचे सदस्य प्रकाश सरपाटील यांनी दिली.

या वेळी तालुक्यातील मच्छिमार उपस्थित होते, ऋषिकांत डोंगरीकर, जगन वाघरे, राजपुरीच्या गिदी आदी उपस्थित होते. कोरोनामुळे मासेमारी बंद आहे. मार्च ते मे महिना हा हंगाम मासेमारांना नफा देणारा असतो. ह्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळेपण मिळाले मासे विकण्यासाठी ससून डॉक व भाऊंचा धक्का हि बाजारपेट बंद असल्याने मासळी पडून राहत होती. त्यामुळे कोळी बांधवांच्या बोटी मार्चमहिन्यात  किनार्‍यावर चढल्या त्या पुन्हा समुद्रात गेल्याच नाही. त्यामुळे हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. किनार्‍यावर जाळी टाकून मासेमारी करून एक वेळची जेवणाची सोया कोळी बांधव करत होते. सतत होणार्‍या लोकडाऊनमध्ये जीवनावश्यक वास्तूच्या किमती वाढत गेल्या आणि जीवन जगणे फार कठीण झाले. अशा परिस्थिती तो जगाला आत आगोस्त पासून पुन्हा मासळीचा हंगाम सुरु होत आहे. या हंगामातील मासळी खरेदी विक्रीसाठी बंद असलेली आगरदांडा जेटी तात्पुरत्या स्वरूपात मासेमारांना येण्यात यावी अशी मागणी प्रादेशिक बंदर अधिकारी यांच्याकडे मुरुड तालुका मच्छिमार संघाचा  वतीने सदस्य प्रकाश सरपाटील यांनी केली. परंतु त्यांच्या कडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कोळी बांधव संतप्त झाले.

Check Also

‘महावितरण’ने कारभार सुधारावा

मागण्या मान्य न झाल्यास करणार आंदोलन कर्जत : बातमीदार कर्जत शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा …

Leave a Reply

Whatsapp