Saturday , August 15 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / दहावीच्या परीक्षेत विद्यालयांचे सुयश

दहावीच्या परीक्षेत विद्यालयांचे सुयश

पी. पी. खारपाटील विद्यालय : 86.13 टक्के

चिरनेर : रामप्रहर वृत्त

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला असून चिरनेर येथील पी.पी. खारपाटील एज्युकेशन सेासायटीच्या परशुराम धाकू खारपाटील माध्यमिक विदयालयातील इयत्ता दहावी शालांत परिक्षेचा शेकडा निकाल 86.13 टक्के इतका लागला असून, शाळेत अनुक्रमे मुलींनीच बाजी मारली आहे.

शाळेत पूजा हनुमंत पाटील हिने 85.80 टक्के गुण मिळवून शाळेत पहिली आहे. मनाली राजेश पाटील हिने 80.40 टक्के गुण मिळवून दुसरी आली. सुनाक्षी धु्रव पाटील हिने 79.60 टक्के गुण मिळवून तिसरी आली. या शाळेतून 101 विद्यार्थी परिक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 87 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचेच शाळचे संस्थापक, अध्यक्ष पी.पी. खारपाटील, उपाध्यक्ष राजेंद्रशेठ खारपाटील, सचिव समीर खारपाटील, कार्याध्यक्ष सागर खारपाटील, माजी मुख्याध्यापक व्हि. ए. पाटील प्रशासकिय अधिकारी आर. एन. पाटील, मुख्याध्यापक सुरदास राऊत व पर्यवेक्षक आनंद चिर्लेकर यांनी अभिनंदन केले आहे.

ज्ञानाई माध्यमिक विद्यालय : 94.44 टक्के

खारघर : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यातील धामणी या आदिवासी वाडीतील आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या ज्ञानाई माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 94.44 टक्के लावुन आदिवासी समाजाचे विद्यार्थी देखील भविष्यात भारताच्या प्रगतीत आपला वाटा निर्माण करणार हे सिद्ध केले आहे.

पनवेल तालुक्यातील शहरापासून सुमारे 20 ते 25 किमी अंतरावर असलेल्या धामणी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले यश संपादित करीत धामणी आदिवासी वाडीतील शाळा प्रकाशझोतात आणली आहे. या शाळेतुन सावित्रा शंकर पारधी हिने 67.60 टक्के गुण संपादित करून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. रुपेश कान्हू वीर याने 67 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे तर एकनाथ किसन पारधी याने 65 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष महादेव शहाबाजकर, शिक्षक रवींद्र ठाकूर, पुष्पलता ठाकूर आदींनी अभिनंदन व कौतुक केले.

इंदूबाई वाजेकर विद्यालय : 100 टक्के

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल शहरातील अग्रगण्य अशा कोकण एज्युकेशन सोसायटीच्या इंदूबाई आ. वाजेकर इंग्रजी माध्यम शाळेचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला. शाळेतून एकूण 247 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये 90 विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये 111 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये तर 45 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.

या मध्ये रूतुजा पाचपुते हिने 96 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला, अपुर्वा पाटील हिने 95.60 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर समिता ठाकूर हिने 93.40 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे शाळा समितीचे सभापती व्ही. सी. म्हात्रे, सदस्य सुभाष देशपांडे, शाळेच्या माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुक्रमे मनिषा पाटील व मानसी कोकीळ तसेच शिक्षक आणि पालक यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

के. व्ही. कन्या विद्यालय : 97.35 टक्के

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोकण एज्युकेशन सोसायटीच्या पनवेल येथील केशवजी विरजी कन्या विद्यालयाचा दहावीचा निकाल 97. 35 टक्के लागला आहे. विद्यालयातील शर्वरी हेमंत करंबेळकर हिला 99 टक्के गुण मिळाले आहेत.

मार्च 2020मध्ये झालेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. केशवजी विरजी कन्या विद्यालयातील शर्वरी करंबेळकर हिने 500 पैकी 495 गुण (99 टक्के) मिळवले. तर श्रावणी बाळकृष्ण माळी हिला 98 टक्के, सौंदर्या पंकज डोंगरे हिला 97.20 टक्के, वैष्णवी अनंत मुंढे हिस 95.40 टक्के आणि प्रियांका राजू डोंगरे हिला 95.20 टक्के गुण मिळाले आहेत.

प्रिआ स्कूल : 100 टक्के

मोहोपाडा : प्रतिनिधी

मोहोपाडा येथील प्रिआ स्कुलने इयत्ता दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा सत्ताविसाव्या वर्षीही कायम राखली आहे. यावर्षी परीक्षेसाठी एकूण 106 विद्यार्थी बसले होते. त्यातील 51 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य मिळाले तसेच पहिल्या श्रेणीमध्ये 50 विद्यार्थी व दुसर्‍या श्रेणीत पाच विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

पहिल्या तीन क्रमांकाचे मानकरी पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक तरुण परिहार  93.00 टक्के, द्वितीय क्रमांक खुशी म्हात्रे 92.80 टक्के, तृतीय क्रमांक संतोष धमाल 92.40 टक्के असे आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्कुलच्या मुख्याध्यापिका जोसी जोसेफ, स्कुल कमिटीच्या चेअरमन उल्का धुरी व सर्व सदस्य यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व पालकांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Check Also

‘महावितरण’ने कारभार सुधारावा

मागण्या मान्य न झाल्यास करणार आंदोलन कर्जत : बातमीदार कर्जत शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा …

Leave a Reply

Whatsapp