Saturday , August 15 2020
Home / महत्वाच्या बातम्या / कशेडी घाटातून सरसकट रत्नागिरी जिल्हा प्रवेश

कशेडी घाटातून सरसकट रत्नागिरी जिल्हा प्रवेश

पोलादपूर : प्रतिनिधी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात शनिवारी रात्रीपासून सुरु झालेल्या वाहतुकीच्या खोळंब्यानंतर रविवारी सरसकट रत्नागिरी जिल्हा प्रवेश देण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने घेतला. मात्र कशेडी घाटातील तपासणी नाक्यावर प्रवाशांचे नोंदविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

कशेडी घाटातील कशेडी बंगला येथे रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा बंदी पुकारण्यात आली होती. यामुळे जाणार्‍या चाकरमानी प्रवाशांची वैद्यकीय प्रमाणपत्रे व इपास यांची तपासणी केली जात होती. शनिवारी अनलॉक-3 मिशन बिगीन्स अगेन सुरु झाल्यानंतर कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांची वाहने मोठया संख्येने कशेडी घाटातून जाऊ लागली. त्यामुळे कशेडी बंगला येथील तपासणी नाक्यावर वाहने थांबवून प्रवाशांची कागदपत्रे तपासण्याची मोहीम सुरू झाली.

परिणामी, मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होऊन कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना रखडावे लागले. यामुळे चाकरमान्यांच्या नाराजीचा सूर प्रचंड प्रमाणात उमटू लागला. यामुळे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला जिल्हाबंदी आणि प्रवेशासाठी ची कागदपत्रे तपासणीची मोहीम गुंडाळून घ्यावी लागली. केवळ वाहनांची नोंदणी व चाकरमानी प्रवाशांची नावे आणि पत्ता एवढीच नोंद होऊन वाहनांना मार्गस्थ करण्यात येऊ लागले. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा दूर झाला.

Check Also

‘महावितरण’ने कारभार सुधारावा

मागण्या मान्य न झाल्यास करणार आंदोलन कर्जत : बातमीदार कर्जत शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा …

Leave a Reply

Whatsapp