Saturday , January 23 2021
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / बकरी ईदनिमित्त रक्तदान

बकरी ईदनिमित्त रक्तदान

पाली ः प्रतिनिधी

समाजात काही थोडे लोक आपल्या विचारांना कृतीची जोड देतात आणि कृतीतून प्रबोधन घडवितात. नासिर वल्लाद हे इंजिनिअर त्यातीलच एक असून तब्बल 19 वर्षांपासून बकरी

ईदनिमित्त ते रक्तदान करीत आहेत. यंदाही बकरी ईदच्या दिवशी त्यांनी रक्तदान केले. त्यांच्या या मानवतावादी सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नासिर यांच्या घरात बकरी ईदनिमित्त कुर्बानी दिली जात नाही. ईदनिमित्त सर्वधर्मीय बांधव त्यांच्या घरी येतात आणि शुभेच्छा देतात. पुरोगामित्व सिद्ध करणारी अनेक उदाहरणे नासिर यांनी दाखवून दिली आहेत. लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी आणि विशेष म्हणजे एक मुलगी असूनही त्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली आहे. नासिर अपघातग्रस्तांच्या मदतीलाही धावून येतात. रक्तदानाद्वारे नासिर वल्लाद यांनी एक विधायक व पुरोगामी पाऊल उचलून समाजास आदर्श घालून दिला आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व मुस्लिम सत्यशोधक मंडळ बकरी ईदनिमित्त मागील आठ वर्षांपासून रक्तदानाचे राज्यव्यापी अभियान राबवत आहे. जातधर्मापलीकडे जाऊन मानवतेचा संदेश देण्यासाठी तसेच त्याग, सेवा, सद्भावना या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचा हा एक प्रयत्न आहे. नासिर यांनी 19 वर्षांपूर्वी सुरू केलेला हा प्रयत्न बकरी ईदच्या कुर्बानीला सुसंगत व विधायक पर्याय ठरेल असा विश्वास वाटतो. -मोहन भोईर, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष, महा. अंनिस

Check Also

देशात पंतप्रधान मोदींचीच हवा!

सर्व्हेनुसार एनडीए पुन्हा सत्ता काबीज करू शकते नवी दिल्ली : वृत्तसंस्थापुढील लोकसभा निवडणूक होण्यासाठी आणखी …

Leave a Reply

Whatsapp