Saturday , July 4 2020
Home / महत्वाच्या बातम्या / मिलिंद खाडेला न्यायालयीन कोठडी

मिलिंद खाडेला न्यायालयीन कोठडी

पनवेल : बातमीदार

दोन लाख रुपयांची खंडणी घेताना रंगेहाथ पकडला गेलेला मनसेचा कामोठे उपशहराध्यक्ष मिलिंद खाडे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. खाडे याने जुई-कामोठे येथील जमीनमालक धर्मा जोशी यांनी विनापरवानगी वृक्ष छाटल्याचे निमित्त करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे धमकावून त्यांच्याकडे सहा लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाने गेल्या आठवड्यात त्याला सापळा रचून अटक केली.

खाडेच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी (दि. 11) संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. खाडे याने धर्मा जोशी यांना धमकावतानाचे व्हिडीओ आणि ऑडिओचा अधिक तपास करण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली, मात्र न्यायालयाने मिलिंद खाडे याला न्यायालयीन कोठडी ठोठावली. दरम्यान, खाडे याने जमीनमालक धर्मा जोशी यांना सहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकावताना नवी मुंबईतील काही बिल्डर्सची नावे घेतल्याचे आढळून आले आहे. त्या बिल्डर्सनासुद्धा त्याने धमकावून खंडणी उकळली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे खाडे याचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Check Also

विस्तारवादाचे युग संपले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीनला इशारा लडाख : वृत्तसंस्थाभारताने कायम मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केले आहे. गेल्या …

Leave a Reply

Whatsapp