Sunday , September 20 2020
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / क्रीडा / ‘म्हणून धोनीने घेतली 7.29 वाजता निवृत्ती’

‘म्हणून धोनीने घेतली 7.29 वाजता निवृत्ती’

चेन्नई : वृत्तसंस्था
संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करीत आज संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी मी निवृत्त झालोय असे समजावे, अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी धोनीच्या या वेळेमागचे गणित उलगडवून दाखवले आहे.
विश्वनाथन म्हणाले, दक्षिणेकडील राज्यांत 7 वाजून 29 मिनिटांची वेळ ही सूर्यास्ताची मानली जाते. माझ्या मते याच कारणासाठी त्याने ही वेळ निवडली.
दरम्यान, धोनी सध्या आयपीएलची तयारी करीत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरीही धोनी आयपीएल खेळणार आहे.

Check Also

वाचनालय, इनडोअर क्रीडा संकुल व जलतरण तलावाची नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून महासभेत मागणी

पनवेल : वार्ताहर – माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत …

Leave a Reply

Whatsapp