Sunday , July 25 2021
Breaking News

रायगडात 430 नवे कोरोना पॉझिटिव्ह; नऊ रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 31) 430 नव्या कोरोना रुग्णांची आणि नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दुसरीकडे 252 जण दिवसभरात बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 225, अलिबाग 64, पेण 49, रोहा 22, कर्जत 20, खालापूर व सुधागड प्रत्येकी 14, उरण नऊ, महाड चार, तळा तीन आणि मुरूड, माणगाव व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे, तर मृत रुग्ण पनवेल तालुक्यात तीन, अलिबाग व सुधागड प्रत्येकी दोन आणि खालापूर व पेण तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 27,564 व मृतांची संख्या 809 झाली आहे. जिल्ह्यात 23,097 जण कोरोनामुक्त झाल्याने 3658 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

मॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य

पनवेल ः वार्ताहर कळंबोली येथील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट व्यवस्थापकाच्या मनमानीला कंटाळून येथील कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि. 23) …

Leave a Reply

Whatsapp