Sunday , September 20 2020
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / देश-विदेश / आता अयोध्येत उद्धव ठाकरेंचे स्वागत नाही तर तीव्र विरोध होणार

आता अयोध्येत उद्धव ठाकरेंचे स्वागत नाही तर तीव्र विरोध होणार

विश्व हिंदू परिषदेची घोषणा

अयोध्या : वृत्तसंस्था
मुंबई महापालिकेकडून बांधकाम अवैध ठरवून अभिनेत्री कंगना रानौत हिचे घर उद्ध्वस्त केल्यानंतर शिवसेनेवर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली. आता विश्व हिंदू परिषदेने यापुढे उद्धव ठाकरेंचे अयोध्येत स्वागत होणार नाही तर तीव्र विरोध केला जाईल, अशी घोषणा केली आहे.
’उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे अयोध्येत कोणतेही स्वागत होणार नाही. आता जर इथे आले तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अयोध्येतील संतांच्या विरोधाचा सामना करावा लागेल’, असा इशाराच विश्व हिंदू परिषदेने दिला आहे.
’वेळ न दवडता महाराष्ट्र सरकारने अभिनेत्रीविरुद्ध कारवाई केली, परंतु हेच सरकार अद्याप पालघरमध्ये झालेल्या दोन साधूंच्या हत्यार्‍यांविरोधात कारवाई करू शकलेले नाही’, असेही त्यांनी म्हटलंय.
’अभिनेत्री कंगना रानौत राष्ट्रवादी शक्तींचे समर्थन करीत आहे तसेच तिने मुंबईतील ड्रग्ज माफियांविरोधात आवाज उचलला. म्हणूनच तिला जाणूनबुजून निशाण्यावर घेतले जातंय, हे खूप स्पष्ट आहे, असे विश्व हिंदू परिषदेचे स्थानिक प्रवक्ते शरद शर्मा यांनी म्हटले आहे, तर अयोध्येतील संत समाजाचे प्रमुख महंत कन्हैया दास यांनी असामाजिक कारवायांत सहभागी असलेल्यांचा बचाव करण्याचा आरोप करीत मुख्यमंत्र्यांना अयोध्य न येण्याचा इशारा दिला. ’बाळासाहेब ठाकरेंच्या आधीन असलेली शिवसेना आता उरलेली नाही’, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

Check Also

वाचनालय, इनडोअर क्रीडा संकुल व जलतरण तलावाची नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून महासभेत मागणी

पनवेल : वार्ताहर – माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत …

Leave a Reply

Whatsapp