Sunday , September 20 2020
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / देश-विदेश / 17 खासदारांना कोरोनाची लागण

17 खासदारांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सोमवार (दि. 14)पासून प्रारंभ झाला. या पार्श्वभूमीवर केलेल्या चाचणीत पाच खासदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. त्यातच कामकाज सुरू होण्यापूर्वी आलेल्या अहवालानुसार लोकसभेच्या 17 खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे.  
कोरोनाबाधित झालेल्या खासदारांमध्ये भाजपचे 12, वायएसआर काँग्रेसचे दोन आणि शिवसेना, डीएमके व आरएलपीच्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. केंद्रीय मंत्र्यांच्याही कोरोना चाचण्या करण्यात येत असून, त्यातील काही मंत्र्यांच्या चाचण्या अद्याप बाकी आहेत.

Check Also

वाचनालय, इनडोअर क्रीडा संकुल व जलतरण तलावाची नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून महासभेत मागणी

पनवेल : वार्ताहर – माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत …

Leave a Reply

Whatsapp