Sunday , September 20 2020
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / कोरोना रुग्णांमध्ये महाराष्ट्र जगात चौथा

कोरोना रुग्णांमध्ये महाराष्ट्र जगात चौथा

मुंबई : प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत असतानाच कोविड-19 रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र जगात चौथ्या स्थानी पोहोचला आहे. जागतिक पातळीवर सर्वाधिक कोरोनाबाधित अमेरिकेत आहेत. त्याखालोखाल भारत दुसर्‍या क्रमांकावर, तर ब्राझिल तिसर्‍या क्रमांकावर आहे. चिंताजनकची बाब म्हणजे कोरोनाबाधितांच्या संख्येत आपल्या देशातील महाराष्ट्र राज्याने जगात चौथे स्थान गाठले आहे.
जगात सर्वाधिक रुग्णसंख्येत चौथ्या स्थानी रशिया होता. तिथे 10 लाख 68 हजार कोरोनाबाधित आहेत, मात्र आता रशियापेक्षा जास्त कोरोनाबाधित महाराष्ट्रात झाले आहेत. राज्यात 10 लाख 77 हजार 374 कोरोनाबाधितांची नोंद मंगळवारी (दि. 15) सकाळी झाली. त्यापैकी सात लाख 55 हजार 850 रुग्ण बरे झाले आहेत, तर दोन लाख 91 हजार 256 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात कोरोनाने तब्बल 29 हजार 894 जणांचा बळी घेतला आहे.
देशात सर्वाधिक सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात दोन लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. महाराष्ट्रानंतर दुसर्‍या क्रमांकावर तामिळनाडू, तिसर्‍या क्रमांकावर दिल्ली, चौथ्या क्रमांकावर गुजरात आणि पाचव्या स्थानावर पश्चिम बंगाल आहे. या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत.
देशभरात आतापर्यंत 80 हजारांपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, बाधितांचा आकडा 50 लाखांच्या घरात पोहोचला आहे. देशात मंगळवारी सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 83 हजार 809 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 1054 जणांचा मृत्यू झाला. देशात 2 सप्टेंबरपासून दररोजचा कोरोनाबळींचा आकडा एक हजारापेक्षा जास्त आहे.
देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 49 लाख 30 हजार झाली. त्यापैकी 80 हजार 776 जणांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या नऊ लाख 90 हजार झाली असून, 38 लाख 59 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. दिलासादायब बाब म्हणजे सक्रिय रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सुमारे चारपट अधिक आहे.
देशात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे मृत्यूदर आणि सक्रिय रुग्णांच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मृत्यूदर घसरून 1.63 टक्के झाला आहे. याशिवाय सक्रिय रुग्ण ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यांचा दरही कमी होऊन 20 टक्क्यांवर आला आहे. यासोबतच रिकव्हरी रेट म्हणजेच कोरोनामुक्त होण्याचा दर 78 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात रिकव्हरी रेट साततत्याने वाढत आहे.

Check Also

वाचनालय, इनडोअर क्रीडा संकुल व जलतरण तलावाची नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून महासभेत मागणी

पनवेल : वार्ताहर – माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत …

Leave a Reply

Whatsapp