Sunday , September 20 2020
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / कर्जत भाजपची महावितरणवर धडक

कर्जत भाजपची महावितरणवर धडक

वाढीव वीज बिलासह ग्राहकांच्या अन्य समस्या मार्गी लावण्याची मागणी

कडाव : प्रतिनिधी
कोरोना संक्रमण काळात अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. असे असताना महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल आकारले आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. याची दखल घेत भारतीय जनता पक्ष कर्जत मंडलाच्या वतीने अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर धडक देत वाढीव वीज बिलासह विविध समस्यांची सोडवणूक करण्याची मागणी उपअभियंता घुले यांना निवेदन देऊन करण्यात आली.
भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्यासह जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, प्रदेश सचिव ऋषिकेश जोशी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष परशुराम म्हसे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष किरण ठाकरे, नगरसेवक बळवंत घुमरे, कर्जत शहर सरचिटणीस प्रकाश पालकर, वसंत महाडिक, महिला शहराध्यक्ष सरस्वती चौधरी, नगरसेविका स्वामिनी मांजरे, बिनिता घुमरे, वसंत महाडिक आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील महावितरण कार्यालयात जाऊन नागरिकांच्या समस्या उपअभियंता घुले यांना सांगितल्या. या वेळी रमेश मुंढे यांनी महावितरणच्या कारभारावर शंका व्यक्त करीत आपल्या आक्रमक शैलीत घुलेंना धारेवर धरले.
कोरोन काळात आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांना महावितरण कंपनीने आकारलेल्या वाढीव वीज बिलांची झळ बसली आहे. यासंदर्भात तक्रारी घेऊन येणार्‍या नागरिकांना सवलत सोडाच, पण साधी समाधानकारक उत्तरही मिळत नसल्याने नागरिकांमध्ये महावितरणच्या मनमानी व भोंगळ कारभाराबद्दल असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत कर्जत भाजपने आक्रमक पवित्रा घेत महावितरणचे उपअभियंता घुले यांना निवेदन देत वीज बिल व ग्राहकांच्या अन्य समस्यांविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरूपात मागितली आहेत तसेच वाढीव वीज बिलासंबंधी ठोस पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोरोनाचा जीवघेणा प्रसंग व त्यातच महावितरण कंपनीची मुजोरी हे समीकरण सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणणारे आहे. त्यामुळे यापुढे कर्जत तालुक्यातील नागरिकांना आपल्याला आलेल्या वाढीव वीज बिलासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी ती भाजप कार्यालयात लेखी स्वरूपात द्यावी. या तक्रारीचे  निवारण करण्याचा आम्ही प्रयत्न करू.
-मंगेश म्हसकर, अध्यक्ष, कर्जत तालुका भाजप

Check Also

वाचनालय, इनडोअर क्रीडा संकुल व जलतरण तलावाची नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून महासभेत मागणी

पनवेल : वार्ताहर – माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत …

Leave a Reply

Whatsapp