Sunday , September 20 2020
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / पनवेल तालुक्यात 283 नवे कोरोनाबाधित

पनवेल तालुक्यात 283 नवे कोरोनाबाधित

पाच जणांचा मृत्यू; 235 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि.15) कोरोनाचे 283 नवीन रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 235 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 215 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 159 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 68  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 76 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात खारघर सेक्टर 35 अरिहंत तनया, सेक्टर 19 एकदंत सोसायटी, सेक्टर 20 हावरे गुलमोहर सोसायटी, कामोठे सेक्टर 19 वैकुंठ सोसायटी आणि सेक्टर 9 श्री गणेश सोसायटी येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मंगळवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 47 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2570 झाली आहे. कामोठेमध्ये 45 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3355 झाली आहे. खारघरमध्ये 48 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 3129 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 47 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2865 झाली आहे. तळोजामध्ये नवीन रुग्ण न आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 689 आहे.

पनवेलमध्ये 28 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2727 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 15335 रुग्ण झाले असून 12839 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.72 टक्के आहे. 2144 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 352 जणांचा मृत्यू झाला आहे.

कर्जतमध्ये 31 कोरोना पॉझिटिव्ह

कर्जत : कर्जत तालुक्यात मंगळवारी एका डॉक्टर, तीन पत्रकारांसह 31 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून तालुक्यातील रुग्णांची संख्या 1297 झाली असून 1019 रुग्ण बरे झाले आहेत तर आज एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 57 वर गेली आहे. कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका डॉक्टरचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तर ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय संतोष पवार यांच्या उपचारासाठी धावपळ करणार्‍या तीन पत्रकारांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यातील दोन कर्जत शहरातील तर एक लाखरण गावातील आहे.

उरण तालुक्यात 12 नवे रुग्ण

उरण : उरण तालुक्यात मंगळवारी कोरोनाचे 12 नवे रुग्ण आढळले असून 45 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये ग्रडवेल कॅम्पस मोरा, करंजा कोंढरीपाडा, खोपटे कोप्रोली, बोकडवीरा प्रत्येकी दोन, सोनारी, मांगीरदेव, डाऊरनगर, चीर्ले येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1666 झाली आहे. 1369 बरे झाले आहे. 218 रुग्ण उपचार घेत आहेत व 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाडमध्ये 18 जणांना लागण

महाड : महाड तालुक्यात मंगळवारी कोरोनाचे 18 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 18 जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांत शहर पोलीस ठाणे तीन, आसनपोई तीन, एमजी रोड तीन, सरेकरआळी दोन, मधली आळी, काकरतळे, कांबळे तर्फे बिरवाडी, चांभारखिंड, प्रभात कॉलनी, विन्हेरे, दादली येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तसेच आसनपोई  येथील एकाचा मृत्यू झाला आहे. महाडमध्ये 222 रुग्ण उपचार घेत असून, 52 जणांचा मृत्यू झाला आहे. 1114 रुग्ण बरे झाले आहे तर 1388 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

नवी मुंबईत 405 जण कोरोनामुक्त

नवी मुंबई : नवी मुंबईत मंगळवारी 405 जण कोरोनामुक्त तर 311 जण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 31 हजार 316 तर बरे झालेल्यांची 27 हजार 182 झाली आहे. दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 671 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये  बेलापूर 41 , नेरुळ 61, वाशी 29, तुर्भे 42, कोपरखैरणे 30, घणसोली 27, ऐरोली 73, दिघा आठ जणांचा समावेश आहे.

Check Also

वाचनालय, इनडोअर क्रीडा संकुल व जलतरण तलावाची नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून महासभेत मागणी

पनवेल : वार्ताहर – माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत …

Leave a Reply

Whatsapp