Sunday , September 20 2020
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / स्कूल बसचालकांना राज्य शासनाने दिलासा द्यावा; स्कूल बस असोसिएशनची मागणी

स्कूल बसचालकांना राज्य शासनाने दिलासा द्यावा; स्कूल बस असोसिएशनची मागणी

पनवेल : बातमीदार

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात जवळपास एक हजारच्या आसपास स्कूल बस व व्हॅन धावतात. यातील अनेकांनी बँका किंवा इतर वित्तसंस्थांकडून व्हॅनखरेदीसाठी कर्ज घेतले आहे. टाळेबंदीमुळे यातील बसमालकांसह व्हॅनधारकांचे हप्ते थकले आहेत. त्याच्या वसुलीसाठी बँकांकडून तगादा सुरू असल्याचे बसचालक सांगतात. राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन व्हॅनचालकांना दिलासा द्यावा, तसेच ज्यांचे हप्ते थकले आहेत, त्यांचे व्याज माफ करावे अशी विनंती करण्यात येत आहे. नवी मुंबईला शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते. नवी मुंबईत प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या मोठी आहे. या शाळांतील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी स्कूल बसबरोबरच छोट्या व्हॅन उपयुक्त ठरल्या आहेत. कोरोनामुळे शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद असल्याने स्कूल बसचे चाकही रूतले आहे. स्कूल बस व्यवसायावर उदरनिर्वाह करणार्‍या चालक, क्लीनर मदतनीस व महिला सहायक आदींच्या हाताचे काम गेले आहे. स्कूल बस, व्हॅन या जागेवरच उभ्या असल्यामुळे गाड्ंयाचा हप्ता कसा भरायचा असा प्रश्न आहे. या गाड्यांचा देखभाल खर्च व विमा हप्त्याच्या खर्चाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढत्या किमती, वाहनकर्जाचा हप्ता, डिझेल दरवाढ, चालक, मदतीनस, महिला सहायक यांचा पगार, विम्याच्या हप्त्याच्या रकमेत झालेली वाढ, गाडी पासिंगच्या शुल्कात झालेली वाढ आदींचा खर्च पाहता स्कूल बसचालकांचे कंबरडे मोडले आहे. या क्षेत्रास सरकारी मदतीची गरज असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. 

Check Also

वाचनालय, इनडोअर क्रीडा संकुल व जलतरण तलावाची नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून महासभेत मागणी

पनवेल : वार्ताहर – माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत …

Leave a Reply

Whatsapp