Sunday , September 20 2020
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / दर्शना भोईर यांची नियुक्ती

दर्शना भोईर यांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिकेच्या भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांची पैलवानग्रुप कुस्ती प्रेमी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कोकण विभाग महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दर्शना भोईर या माजी महिला व बालकल्याण समिती सभापती, शांतता कमिटी सदस्य, भाजप पनवेल-खारघर संपर्क प्रमुख, इनरव्हील क्लब पनवेल, उदयनराजे रायगड ग्रुप सदस्य, जिल्हा सरचिटणीस अशी पदे भूषवित असून, समाजाप्रति करीत असलेल्या त्यांच्या लोकोपयोगी कार्याची दखल घेत पैलवानग्रुप कुस्तीप्रेमी संस्थापक तथा अध्यक्ष मारुती (भाऊ) जाधव यांच्या संमतीने व कविता कोळी महाराष्ट्र राज्य महिला संपर्क प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली भोईर यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल नगरसेविका भोईर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेकांनी फोन करून करून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

वाचनालय, इनडोअर क्रीडा संकुल व जलतरण तलावाची नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून महासभेत मागणी

पनवेल : वार्ताहर – माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत …

Leave a Reply

Whatsapp