Saturday , November 28 2020
Home / महत्वाच्या बातम्या / क्रीडा / मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात रंगणार सलामीचा सामना 

मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात रंगणार सलामीचा सामना 

दुबई : वृत्तसंस्था
संयुक्त अरब अमिरात (यूएई) या देशात शनिवार (दि. 19)पासून पुढचे जवळपास दोन महिने यंदाची इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल रंगणार आहे. कोरोनाचा कमीत कमी प्रभाव असल्याने यूएईमध्ये आयपीएलच्या तेराव्या मोसमाचे आयोजन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केले आहे.
आयपीएलच्या उद्घाटनाचा सामना चार वेळा विजेतेपद मिळवणार्‍या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेता ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शनिवारी अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियमवर होणार आहे.  
आयपीएलचे आयोजन देशाबाहेर करण्याची ही आजवरची तिसरी वेळ आहे. याआधी लोकसभा निवडणुकीमुळे 2009 साली दक्षिण आफ्रिकेत, तर 2014 साली दुबईत आयपीएलचा सोहळा रंगला होता. यंदाही 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरदरम्यान दुबईमध्ये आयपीएल खेळवली जात आहे.

Check Also

गतिमान वाटचाल कोकणाची

कोकण महसूल विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र …

Leave a Reply

Whatsapp