Wednesday , October 28 2020
Home / महत्वाच्या बातम्या / नेरळचे रेल्वे फाटक दोन दिवस बंद

नेरळचे रेल्वे फाटक दोन दिवस बंद

कर्जत ः बातमीदार

मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील नेरळ-भिवपुरी रोड रेल्वेस्टेशनदरम्यान असलेले फाटक 21 ते 22 सप्टेंबर या कालावधीत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या ठिकाणी असलेल्या रुळाखाली खडी टाकण्याचे काम करण्यासाठी हे फाटक बंद ठेवले जाणार असून यापूर्वी याच महिन्यात तीन दिवस फाटक बंद ठेवण्यात आले होते.

मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर नेरळ-कर्जत या स्थानकांदरम्यान असलेले मुंबईवरून 86 किलोमीटर अंतरावर गेट नंबर 21 आहे. हे फाटक नेरळ ग्रामपंचायत हद्दीत येत असून नेरळ रेल्वेस्टेशन सोडल्यानंतर लोकवस्तीत फाटक आहे. कर्जत तालुक्याचा अर्धा भाग असलेल्या कशेलेपासून कळंबपर्यंतच्या 100हून अधिक गावांतील लोक नेरळ गावात येण्यासाठी या फाटकाचा वापर करतात. त्यामुळे या फाटकातून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे फाटकातील मध्य रेल्वेच्या रुळांची दुरुस्ती सातत्याने करावी लागते. वाहनांच्या वर्दळीमुळे मार्गावरील रुळाची दुरुस्तीऐवजी रुळामध्ये असलेला रस्ता सुस्थितीत असावा यासाठी मध्य रेल्वेकडून फाटक बंद करून दर दोन वर्षांनी दुरुस्तीची कामे केली जातात.

3 ते 5 सप्टेंबर या कालावधीतही दुरुस्तीच्या कामासाठी फाटक बंद ठेवण्यात आले होते. त्या वेळी अर्धवट राहिलेली कामे आता 21 व 22 सप्टेंबरदरम्यान पूर्ण केली जाणार आहेत. 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 22 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत हे फाटक बंद असणार आहे. या कालावधीत नेरळ बाजारपेठेमध्ये येणार्‍या वाहनांना पर्यायी मार्गाने यावे लागणार आहे.

Check Also

रावे येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पेण : वार्ताहर तालुक्यातील दुर्गम भागात कोरोना प्रादुर्भावाच्या काळात दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करणार्‍या …

Leave a Reply

Whatsapp