Sunday , November 29 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / स्टेट बँकेकडून रसायनीत रोपांची लागवड

स्टेट बँकेकडून रसायनीत रोपांची लागवड

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायनी येथील स्टेट बँकेच्या वतीने झाडे लावा पर्यावरण वाचवाचा संदेश देत परीसरात वृक्षलागवड करण्यात आली. या वेळी मोहोपाडा रसायनी येथील स्टेट बँके शाखेच्या आवारात तसेच इतर परीसरात विविध जातींच्या शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली.

ही वृक्षलागवड सिएसआर एक्झिक्युटिव्ह फंडातून होत असल्याचे स्टेट बँकेच्या रसायनी शाखेच्या मॅनेजर संगीता शर्मा यांनी सांगितले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत स्टेट बँक ऑफ इंडियाचे जिल्हा चिफ मॅनेजर अरुण शंकर प्रसाद, असिस्टंट मॅनेजर कुमार परिमल प्रेम, सम्यक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाशशेठ गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या वेळी स्टेट बँक ऑफ इंडिया मॅनेजर जिल्हा समन्वयक प्रकाश तांबे, स्टेट बँक ऑफ इंडिया रसायनी ब्रांच मॅनेजर संगीत शर्मा यांच्या सह स्टेट बँक ऑफ इंडिया रसायनी शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

शरद पवारांच्या घरावर काढणार मोर्चा

मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला अल्टिमेटम नाशिक ः प्रतिनिधी – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चाने …

Leave a Reply

Whatsapp