Wednesday , October 28 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / पनवेलमध्ये 258 नवे कोरोनाबाधित

पनवेलमध्ये 258 नवे कोरोनाबाधित

एका रुग्णाचा मृत्यू    252 जणांना डिस्चार्ज

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात रविवारी  (दि.20) कोरोनाचे 258  नवीन रुग्ण आढळले असून एकाचा  मृत्यू  झाला आहे, तर 252 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 212 नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 192 रुग्ण बरे झाले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 46 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 60 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात   कामोठे सेक्टर 7, प्लॉट 25 बी येथील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.   रविवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 37 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2727 झाली आहे. कामोठेमध्ये 50 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3639 झाली आहे. खारघरमध्ये 54 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 3397 झाली आहे.नवीन पनवेलमध्ये 21  नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3025 झाली आहे. पनवेलमध्ये 45 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2965 झाली आहे. तळोजामध्ये पाच नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 710 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 16251 रुग्ण झाले असून. 13978 रुग्ण बरे झाले आहेत. 2115  रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 370  जणांचा मृत्यू झाला आहे.

उरण तालुक्यात 23 नवे रुग्ण

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

उरण तालुक्यात रविवारी कोरोनाचे 23 नवे रुग्ण आढळले व सात रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या 1714  झाली आहे. 1454 बरे झाले आहे. 197 रुग्ण उपचार घेत आहेत व 86 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

महाडमध्ये 14 जणांना लागण

महाड : प्रतिनिधी

महाड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. तालुक्यात रविवारी कोरोनाचे 14 नवे रुग्ण आढळून आले आहे तर 28 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये मांडले बौद्ध वाडी दोन, शिवथर दोन, अष्टविनायक नांगलवाडी दोन, नातोंडी, आसनपोई, सोलम कोंड, वरंध, बिरवाडी, चांभारखिंड, कुंभेशिवथर, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. महाडमध्ये 132 कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत, तर 1306 रुग्ण बरे झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत 1493 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

कर्जतमध्ये 25 कोरोना पॉझिटिव्ह

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यात रविवारी 25 कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1471 झाली आहे. दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 62 वर गेली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये डिकसळ व नेरळ प्रत्येकी तीन, मुद्रे बुद्रुक, माथेरान, कशेळे प्रत्येकी दोन, कर्जत शहर, कचेरी रोड, उपजिल्हा रुग्णालय, म्हाडा वसाहत, भिसेगाव, आकुर्ले, दहिवली, शेलू, मोठे वेणगाव, हुमगाव, उकरूळ, डोणेवाडी, भोईरवाडी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

नवी मुंबईत 367 जण बाधित

नवी मुंबई : नवी मुंबईत 367 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नवी मुंबईत बधितांची संख्या 33 हजार 146 तर 365 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने बरे झालेल्यांची 28 हजार 839 झाली आहे. दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 698 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांची नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 68, नेरुळ 76, वाशी 47, तुर्भे 42, कोपरखैरणे 51, घणसोली 18, ऐरोली 52, दिघा 13 अशी आहे.

Check Also

रावे येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पेण : वार्ताहर तालुक्यातील दुर्गम भागात कोरोना प्रादुर्भावाच्या काळात दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करणार्‍या …

Leave a Reply

Whatsapp