Saturday , November 28 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / पनवेलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे होणार सुशोभीकरण; संयुक्त बैठकीत सकारात्मक चर्चा

पनवेलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे होणार सुशोभीकरण; संयुक्त बैठकीत सकारात्मक चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पनवेल शहरातील पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या संदर्भात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख आणि धार्मिक संघटनांची संयुक्त बैठक मंगळवारी (दि. 27) झाली. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळा  सुशोभीकरण कामाला तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी या वेळी धार्मिक संघटनांकडून करण्यात आली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत येत्या काळात त्याची कार्यवाही केली जाणार आहे.भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती, बौद्धधम्म प्रचार प्रसार समिती आणि त्रिरत्न बौद्ध महासंघ या धार्मिक संघटनांनी मिळून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनची स्थापना आठ वर्षांपूर्वी केलेली असून, या फाऊंडेशनचे अध्यक्ष पनवेल महापालिकेचे नगरसेवक प्रकाश बिनेदार, कार्याध्यक्ष अनिल जाधव, सरचिटणीस सुनील वाघपंजे, पीआरपीचे राज्य सचिव तथा फाऊंडेशनचे प्रमुख सल्लागार नरेंद्र गायकवाड आहेत. डॉ. आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी पनवेल महापालिकेच्या सभागृहात सादरीकरण तसेच सर्व धार्मिक संघटना आणि अधिकार्‍यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक संतोष शेट्टी, प्रकाश बिनेदार, नगरसेविका रूचिता लोंढे, आर्किटेक्ट वैभव पाटील, अभियंता संजय कटेकर, श्री. साळुंखे यांच्यासह  भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र मोरे, जिल्हा अध्यक्ष काशिनाथ कांबळे, पनवेल अध्यक्ष सुनील वाघपंजे, कोषाध्यक्ष तुलसीदास जाधव, बौद्धजन पंचायत समितीचे तालुका उपाध्यक्ष अनिल जाधव, सरचिटणीस अजय जाधव, दीपक गायकवाड, बौद्धधम्म प्रचार प्रसार समितीचे उपाध्यक्ष काशिनाथ गायकवाड, अरुण दुश्मीकर, त्रिरत्न बौद्ध महासंघाचे अध्यक्ष महेंद्र कांबळे, पवन सोनी आदी उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने कामाला सुरुवात करावी, अशी मागणी धार्मिक संघटनांच्या वतीने करण्यात आली तसेच प्रशासन आणि सत्ताधारी यांना पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले.

Check Also

गतिमान वाटचाल कोकणाची

कोकण महसूल विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र …

Leave a Reply

Whatsapp