Sunday , November 29 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / भारतीय मजदूर संघाची आज पनवेल प्रांत कार्यालयावर निदर्शने

भारतीय मजदूर संघाची आज पनवेल प्रांत कार्यालयावर निदर्शने

उरण : वार्ताहर

लेबर कोड 2020 मधील कामगार विरोधी तरतुदी मागे  घ्याव्यात या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने  पनवेल प्रांत कार्यालयावर बुधवारी (दि. 28) सकाळी 11 ते 1 या दरम्यान निदर्शने करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.

शासनाने कारखान्यांना ले ऑफ, क्लोजर, कामगार कपात यासाठी शासनाच्या परवानगीची मर्यादा 300 कामगार संख्येवरुन 100 कामगार संख्या करा,  फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट रद्द करा,  स्टॅण्डींग ऑर्डर लागू होण्याची मर्यादा 300 कामगार संख्येऐवजी 50 कामगार संख्या करा, संपासाठी नोटीसची मर्यादा 14 दिवस कायम ठेवा, कायम स्वरुपाचे काम करणार्‍या कंत्राटी कामगारांना कायम करण्याची तरतुद करा, सनदी अधिकार्‍यांना कायद्यातून सूट देण्याचे दिलेले अमर्याद अधिकार मागे घ्या. कामगार संघटना नोंदणी 60 दिवसांत देण्याची कालमर्यादा निश्चित करा. महिलांना रात्रपाळीत कामाला बोलवण्याचा निर्णय रद्द करणे आदीं मागण्यांसाठी पनवेल प्रांत कार्यालयावर बुधवारी निदर्शने करण्यात येतील.

कोरोनाची दक्षता घेत मास्क लावून सोशल डिस्टंटचा वापर करून सहभागी  होणार आहेत, असे सुरेश पाटील यांनी  सांगितले. या निदर्शनास भारतीय मजदूर संघाची अध्यक्ष सुरेश पाटील, सेक्रेटरी रमेश गोविलकर, संघटक श्रीधर लहाने, खजिनदार रवींद्र दानवे, कोकण विभाग संघटक अ‍ॅड. अनिल दुमणे आदी सहभागी होणार आहेत.

Check Also

शरद पवारांच्या घरावर काढणार मोर्चा

मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला अल्टिमेटम नाशिक ः प्रतिनिधी – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चाने …

Leave a Reply

Whatsapp