Friday , June 25 2021
Breaking News

महाराष्ट्रात आणीबाणी 2.0; दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर उद्धव ठाकरे-इंदिरा गांधींचे पोस्टर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या कारवाईची तुलना भाजपकडून 1975च्या आणीबाणीशी केली जात आहे. त्यातच आता भाजपचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पोस्टर लावत राज्यात आणीबाणी 2.0 लागल्याचे नमूद केले आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या या अटकेवरून भाजपकडून ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. भाजप नेत्यांनी या घटनेची तुलना आणीबाणीशी केली. महाराष्ट्र भाजपकडून राज्य सरकारला लक्ष्य केले जात असतानाच दिल्लीतील भाजपचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी महाराष्ट्र सदनाबाहेर पोस्टर लावत महाराष्ट्रात आणीबाणी 2.0 लागल्याचे म्हटले आहे. या पोस्टरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे फोटो आहेत. ‘आणीबाणी 2.0मध्ये आपले स्वागत आहे,’ असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे.

Check Also

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे उद्या चक्का जाम आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, याचा …

Leave a Reply

Whatsapp