Saturday , November 28 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / भाजपच्या मंडलनिहाय प्रशिक्षण वर्गांचे उद्घाटन; मान्यवरांकडून मार्गदर्शन

भाजपच्या मंडलनिहाय प्रशिक्षण वर्गांचे उद्घाटन; मान्यवरांकडून मार्गदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रशिक्षण विभागाच्या वतीने मंडलनिहाय प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पनवेल शहरसाठी आयोजित वर्गाचे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल ग्रामीण व खारघर मंडलांच्या वर्गाचे आमदार महेश बालदी आणि कामोठे मंडलसाठी आयोजित वर्गाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. 21) उद्घाटन करण्यात आले.
भाजपच्या वतीने दर तीन वर्षांनी हे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. यंदा एकूण वेगवेगळ्या 10 विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी दोनदिवसीय प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पनवेल शहर मंडलच्या वर्गाचे नवीन पनवेल येथील सीकेटी महाविद्यालयात, कामोठे शहर मंडलच्या वर्गाचे तेथील सौ. मिलन प्रल्हाद पै सभागृहात आणि पनवेल ग्रामीण आणि खारघर मंडल यांच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्ल्पेक्समध्येकरण्यात आले. या प्रशिक्षण वर्गाला लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी उपस्थित वक्त्यांनी मार्गदर्शन केले. 

Check Also

गतिमान वाटचाल कोकणाची

कोकण महसूल विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र …

Leave a Reply

Whatsapp