Saturday , November 28 2020
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / पनवेल प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सय्यद अकबर यांची फेरनिवड

पनवेल प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सय्यद अकबर यांची फेरनिवड

पनवेल : वार्ताहर – पनवेल प्रेस क्लबची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. 21) संस्थापक विजय कडू, संतोष घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी नवीन कार्यकारिणीची जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी साप्ताहिक कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांची चौथ्यांदा, तर राज भंडारी यांची सरचिटणीसपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे. याशिवाय महिलांचे संघटन उभे करण्यात आले आहे.

नूतन कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्षपदी प्रकाश म्हात्रे, उपाध्यक्षपदी गणपत वरागडा, देविदास गायकवाड, भरतकुमार कांबळे, सहचिटणीसपदी आप्पासाहेब मगर, विकास पाटील, खजिनदारपदी अनिल राय, संघटकपदी साहिल रेळेकर, सहसंघटकपदी संतोष वाव्हळ, सल्लागारपदी संतोष घरत, महिला आघाडी प्रमुख म्हणून सुमेधा लिम्हण, सहप्रमुख धनश्री सट्टा, प्रसिद्धी प्रमुख सनिप कलोते, तर सदस्यपदी दीपक पळसुले, क्षितिज कडू, विशाल सावंत, रवींद्र चौधरी, जितेंद्र नटे, प्रदीप ठाकरे, असीम शेख, साबीर शेख, शंकर वायदंडे, राजेंद्र कांबळे, प्रमोद जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

Check Also

गतिमान वाटचाल कोकणाची

कोकण महसूल विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र …

Leave a Reply

Whatsapp