Thursday , January 28 2021
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / पंतप्रधान मोदी आज पुण्यात; ‘सिरम’ला भेट देणार

पंतप्रधान मोदी आज पुण्यात; ‘सिरम’ला भेट देणार

पुणे : जगभरात कोरोना विषाणू आजाराने थैमान घातले असून, या आजारावरील लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडूनही तयार करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि. 28) दुपारी 1 ते 2 या वेळेत येथे भेट देऊन माहिती घेणार आहेत. या वेळी ‘सिरम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्यासह शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत. दरम्यान, 4 डिसेंबर रोजी 100 देशांचे राजदूतदेखील या ठिकाणी येऊन कोविड लशीबाबत सद्य परिस्थितीचा आढावा घेणार होते. त्यानुसार सर्व तयारी करण्यात आली होती, मात्र हा नियोजित दौरा काही कारणास्तव रद्द झाला असल्याची माहिती राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.

Check Also

रायगडात आणखी 11 हजार कोविशिल्ड दाखल

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यासाठी आणखी 11 हजार कोविशिल्ड लशींचा साठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात पुरेशा …

Leave a Reply

Whatsapp