Thursday , January 28 2021
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / रायगडात 156 नवे कोरोना पॉझिटिव्ह; एक रुग्णाचा मृत्यू

रायगडात 156 नवे कोरोना पॉझिटिव्ह; एक रुग्णाचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, शनिवारी (दि. 27) नवे 156 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, एकाच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 109 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 93 व ग्रामीण 27) तालुक्यातील 120, अलिबाग 11, उरण आठ, खालापूर सात, पेण चार, रोहा तीन, कर्जत दोन आणि पोलादपूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पेण तालुक्यातील आहे.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 56,859 आणि मृतांची संख्या 1603 झाली आहे. आतापर्यंत 54,115 जण कोरोनामुक्त झाल्याने 1141 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Check Also

रायगडात आणखी 11 हजार कोविशिल्ड दाखल

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यासाठी आणखी 11 हजार कोविशिल्ड लशींचा साठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात पुरेशा …

Leave a Reply

Whatsapp