Thursday , January 28 2021
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / वाढदिवसानिमित्त आश्रमातील मुलांना रेशन धान्य, फळवाटप

वाढदिवसानिमित्त आश्रमातील मुलांना रेशन धान्य, फळवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

भंगारपाडा गावचे सतीश कटेकर यांचा वाढदिवसानिमित्त चिपले येथील इमॅन्युएल आश्रम व आकुरली येथील ब्लेस फाऊंडेशन आश्रम येथील मुलांना रेशन धान्य वाटप त्याचबरोबर फळ वाटप करुन साजरा करण्यात आला. या वेळी भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मुलांना वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या वेळी भाजप पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष राकेश गायकवाड, भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, पनवेल पंचायत समिती सदस्य राज पाटील, भाजयुमो तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, भाजयुमो तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील, भाजप वटघर पंचायत समिती युवा मोर्चा अध्यक्ष मच्छिंद्र कटेकर, समीर कटेकर, मयूर कदम, मच्छिंद्र कदम, केशव कटेकर, प्रकाश कटेकर, निखील कटेकर, सुरज दमडे, दर्शन कटेकर, जयेश कटेकर, प्रतीक कटेकर, सागर कटेकर, निशांत कटेकर व भंगारपाडा ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच या वेळी अरुणशेठ भगत यांची रयत शिक्षण संस्थेच्या समन्वय समितीवर निवड झाल्याबद्दल उपस्थितांनी भगत यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Check Also

रायगडात आणखी 11 हजार कोविशिल्ड दाखल

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यासाठी आणखी 11 हजार कोविशिल्ड लशींचा साठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात पुरेशा …

Leave a Reply

Whatsapp