Saturday , October 16 2021
Breaking News

रायगड प्रीमियर लीगचा थरार

कसळखंड येथील मैदानावर 2 फेब्रुवारीपासून पर्वणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींसाठी पनवेल तालुक्यातील कसळखंड येथील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळच्या वतीने रायगड प्रीमियर लीग (आरपीएल)चे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर 2 ते 8 फेब्रुवारी 2021 या कालावधीत या क्रिकेट सामन्यांचा थरार अनुभवता येणार आहे.
आरपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंना 15 जानेवारीपर्यंत ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. खेळाडूंचा लिलाव 20 जानेवारी रोजी होईल. प्रथम पारितोषिक 1,05,555 रुपये, द्वितीय 1,04,444, तृतीय 1,03,333, चतुर्थ व पंचम पारितोषिक प्रत्येकी 55,555 रुपये आणि पाचही विजेत्यांना भव्य चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मालिकावीर ठरणार्‍या खेळाडूला दुचाकी व चषक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांना फिटनेस सायकल व चषक,  सामनावीर म्हणून कामगिरी बजावणार्‍या खेळाडूला हेल्मेट, गॉगल, झाड व चषक, तर अंतिम विजेत्या संघास हेल्थ पॉलिसी आयोजकांकडून देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे मुख्य आयोजक कसळखंड ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनिल पाटील, शिरढोण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मंगेश वाकडीकर, मंडळाचे अध्यक्ष दत्ता गायकर, उपाध्यक्ष राजू तांडेल असून, आयोजकांकडून स्पर्धेचे नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp