Saturday , October 16 2021
Breaking News

कामोठ्यातील ड्रेनेज लाईनची लिकेज समस्या मार्गी लावणार

नगरसेविका संतोषी तुपे यांचे आश्वासन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे सेक्टर 8 अणि 9 मधील नागरिकांना ड्रेनेज लाईनची लिकेजची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. यामुळे या परीसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात येथील समस्येची नगरसेविका संतोषी तुपे यांनी गुरुवारी (दि. 1) पाहणी करुन ही समस्या लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.

पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे सेक्टर 8 आणि 9 मधील परिसरात ड्रेनेज लाइनचे लिकेज होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, या परिसरात राहणार्‍या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात येथील नागरिकांनी सिडकोकडे पाढपुरावा करूनही समस्या मार्गी लागली नाही. त्यामुळे या संदर्भात नगरसेविका संतोषी तुपे यांनी या ठिकाणची पाहणी करून सिडको आणि महापालिकेकडे पाठपुरावा करणार असून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp