Saturday , October 16 2021
Breaking News

सर्व निवडणुका भाजप सोबतच लढवणार -रामदास आठवले

पनवेल : रामप्रहर वृत्त

पक्षवाढी प्रयत्न करणार असून, पुढील येणार्‍या सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टी सोबतच लढवणार असल्याचे रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रियमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. राज्यव्यापी दौर्‍यायाअंतर्गत त्यांनी बुधवारी (दि. 30) पनवेल येथील व्यंकटेश हॉटेलमध्ये रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  या पत्रकार परिषदेस आरपीआयचे कोकण अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत त्यांनी रिपब्लिकन पक्षाची सदस्य नोंदणी येत्या 10 जानेवारी पूर्वी पूर्ण करून येत्या 26 जानेवारीपर्यंत पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका घेऊन अहवाल निवडणूक आयोगाला सादर करायचा आहे. त्यासाठी लवकर शिस्तपूर्ण सदस्य नोंदणी गांभीर्याने करावी. जो सदस्य नोंदणी करणार नाही त्याला रिपाइं मध्ये स्थान राहणार नाही अशी माहिती दिली.

तसेच केंद्रातील मोदी सरकार हे शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेत असताना विरोधक मात्र याचे राजकारण करुन देशात अस्थीरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. या पत्रकार परिषदेला पनवेल महापालिकेच्या नगरसेविका विद्या गायकवाड, आरपीआयचे कर्जत तालुका अध्यक्ष धर्मनाथ गायकवाड यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp