पेण : प्रतिनिधी
माजीमंत्री तथा आमदार रविशेठ पाटील यांचे निष्ठावंत समर्थक अजय क्षिरसागर यांची पेण नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली आहे.
पक्षांतर्गत समझोत्यानुसार प्रशांत ओक यांनी 28 डिसेंबर 2020 रोजी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी अजय सुरेश क्षिरसागर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. बुधवारी (दि. 13) सकाळी नगरपालिका सभागृहांमध्ये पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून अजय सुरेश क्षिरसागर यांचे नाव जाहीर करताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर अजय क्षिरसागर यांची पेण शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी क्षीरसागर यांनी आमदार रविशेठ पाटील यांचे आशीर्वाद घेतले. नगराध्यक्षा प्रितम पाटील, उपनगराध्यक्षा वैशाली कडू, गटनेते अनिरुद्ध पाटील तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका आदींनी नगरसेवक अजय क्षीरसागर यांना शुभेच्छा दिल्या.