नागोठणे : प्रतिनिधी
भंडारा येथे नुकतीच घडलेली भयावह दुर्घटना येथे पुन्हा घडू नये, या भावनेतून नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी येथील आरोग्य केंद्रात आपत्ती व्यवस्थापन मॉक ड्रिलचे आयोजन केले होते. डॉ. म्हात्रे यांनी या वेळी केंद्रातील कर्मचार्यांच्या सहभागातून आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिक सादर केली. केंद्रात आपत्ती व्यवस्थापन सप्ताह घेण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.