Wednesday , January 20 2021
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / पनवेल-उरण / गावांच्या विकासासाठी भाजपला साथ द्या; आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन; ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त उरणमध्ये प्रचार सभा

गावांच्या विकासासाठी भाजपला साथ द्या; आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन; ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त उरणमध्ये प्रचार सभा

उरण : वार्ताहर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात परिवर्तन घडविले. एकीकडे त्यांनी भ्रष्टाचार करणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या, तर दुसरीकडे विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांचे जीवन सुकर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावांच्या विकासासाठी भाजप उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते उरण तालुक्यातील केगाव वनवटी येथे मंगळवारी (दि. 12) आयोजित प्रचारसभेत बोलत होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ उरण तालुक्यातील केगाव वनवटी येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आमदार महेश बालदी म्हणाले की, ओएनजीसीमधील सीएसआर फंडातून अनेक कामे केली जातील. घारापुरी येथे गेल्या 70 वर्षांपासून वीज नव्हती. ती आणण्याचे काम आम्ही केले. उरण नगर परिषदेमध्ये  विकासासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आणला. सुमारे दोन हजार नागरिकांना पाइपलाइनद्वारे गॅस देण्यात येत आहे. आगामी काळात येथे विकासाची विविध कामे केली जातील. पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा केला जाईल. या सभेस भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष राणी म्हात्रे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शेखर पाटील, शहर अध्यक्ष निलेश पाटील, भाजप तालुका सरचिटणीस सुनील पाटील, उमेदवार विनेश पाटील, श्रुती विनेश पाटील, अरविंद पवार, निकिता पुरव, वैभवी दर्णे, प्रिया दर्णे, अतिश हुजरे, अक्षय पाटील, ऋतुजा ठाकूर, अविनाश पाटील, ज्योत्स्ना कांबळे, रेश्मा गावंड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते.

Check Also

रस्त्याच्या मध्यभागी मोबाइल टॉवरची उभारणी

कामोठेकरांचा संताप पनवेल ः प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग आणि मानसरोवर रेल्वेस्थानक यांना जोडणारा रस्ता हा कामोठ्यातील …

Leave a Reply

Whatsapp