खारघर : रामप्रहर वृत्त
खारघर येथील विविध उद्याने आणि मैदाने सिडकोने पनवेल महापालिकेला हस्तांतरित केली आहेत. या उद्यान व मैदानांमध्ये विविध सुविधा पनवेल महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी (दि. 13) खारघरमधील उद्याने आणि मैदानांची पाहणी केली. या वेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती अ सभापती अनिता पाटील, नगरसेवक अभिमन्यू पाटील, निलेश बाविस्कर, रामजी बेरा, प्रवीण पाटील, नरेश ठाकूर, नगरसेविका आरती नवघरे, भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, वासुदेव पाटील, समीर कदम, किरण पाटील, अमर उपाध्याय यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.