Wednesday , January 20 2021
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / जावयाच्या अटकेनंतर मंत्री नवाब मलिकांचा सावध पवित्रा

जावयाच्या अटकेनंतर मंत्री नवाब मलिकांचा सावध पवित्रा

मुंबई : प्रतिनिधी

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेपाठोपाठ राष्ट्रवादीचे आणखी एक मंत्री अडचणीत आले आहेत. अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्जप्रकरणी अमली पदार्थविरोधी विभागाच्या (एनसीबी) पथकाने बुधवारी अटक केली. यावर मलिक यांनी सावध भूमिका घेतली आहे. ड्रग्जप्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालावर कारवाई करण्यात आल्यानंतर समीर खान यांचे नाव समोर आले होते. खान यांना समन्स बजावत चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले होते. चौकशीनंतर बुधवारी त्यांना अटक करण्यात आली. खान हे नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांचे पती आहेत. जावयाला अटक झाल्यानंतर नवाब मलिक यांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही आणि कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला ही गोष्ट लागू असावी. कायदा आपले काम करेल आणि न्याय होईल. मी न्यायव्यवस्थेचा आदर करीत असून, त्यावर पूर्ण विश्वास आहे, असे मलिक यांनी म्हटले आहे. एनसीबीने वांद्रे येथून ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि बॉलीवूड अभिनेत्रीची पूर्व मॅनेजर राहिला फर्निचरवाला यांना गांजासह अटक केली होती. सजनानी आणि समीर खान यांच्यात गुगल पेच्या माध्यमातून 20 हजारांचा व्यवहार झाला असल्याचे तपासादरम्यान समोर आले. ड्रग्जसाठी हा व्यवहार झाल्याचा एनसीबीला संशय आहे.

Check Also

रस्त्याच्या मध्यभागी मोबाइल टॉवरची उभारणी

कामोठेकरांचा संताप पनवेल ः प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग आणि मानसरोवर रेल्वेस्थानक यांना जोडणारा रस्ता हा कामोठ्यातील …

Leave a Reply

Whatsapp