Sunday , April 11 2021

जेएनपीटीच्या कामगारांना दिलासा

थकबाकीची रक्कम अदा; आमदार महेश बालदी यांचे प्रयत्न

उरण ः वार्ताहर

जेएनपीटी टाऊनशिपमधील कचरा, गारबेज उचलणार्‍या कामगारांना कोणत्याही प्रकारची अग्रिमेंटची सुविधा उपलब्ध नव्हती. अशा कामगारांना मागील पाच वर्षांपासूनची थकबाकी मिळवून देण्याचे काम जेएनपीटी जनरल कामगार संघटनेने केले आहे.

थकबाकीपोटी प्रत्येक कामगाराला सुमारे दीड लाख रुपये मिळवून देण्याचे काम युनियनच्या माध्यमातून करण्यात आले आहे. जेएनपीटीच्या व्यवस्थापनाकडे युनियनने सतत पाठपुरावा करून कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. कामगारांना न्याय मिळाल्याबद्दल कामगारांनी युनियनचे अध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष सुधीर घरत, जनरल सेक्रेटरी जनार्दन बंडा, सहसेक्रेटरी धर्माजी पाटील, जेएनपीटीचे माजी विश्वस्त रवी पाटील आदींचे जेएनपीटी टाऊनशिप येथील जेएनपीटी जनरल कामगार संघटनेच्या कार्यालयात जाऊन आभार मानले.

जेएनपीटी जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून नेहमीच कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम केले जाते. आमच्या युनियनचे सल्लागार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांचे मार्गदर्शन व सहकार्य नेहमीच लाभत आहे. पुढील काळात कामगारांना चांगल्या प्रकारे न्याय मिळवून देण्याचे काम युनियनच्या माध्यमातून केले जाईल, असे प्रतिपादन जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केले आहे.

Check Also

राज्यात पुनश्च लॉकडाऊन?

दोन दिवसांत निर्णय घेणार : मुख्यमंत्री मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply

Whatsapp