Sunday , April 11 2021

गुजरातमधील काँग्रेसचा पराभव कार्यकर्त्यांच्या लागला जिव्हारी

कार्यालयाबाहेर नेत्यांचे पुतळे जाळले

सुरत : वृत्तसंस्था
गुजरातमधील स्थानिक निवडणुकीत भाजपने निर्भेळ यश मिळविले. सहा महापालिकांच्या एकूण 567 जागांपैकी भाजपने 490 जागा जिंकल्या. काँग्रेसला या निवडणुकीत मोठा फटका बसला असून, केवळ 48 जागा जिंकता आल्या आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते निराश झाले असून, त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांप्रती जोरदार विरोध प्रदर्शन केले.
सुरतमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पक्षाच्या कार्यालयाबाहेर जिल्हा आणि शहर अध्यक्षांचे पुतळे जाळण्यात आले. कार्यकर्त्यांनी पेट्रोल टाकून बाबू रायका, कादिर पीरजादा आणि तुषार चौधरी यांचे पुतळे जाळले, तसेच या नेत्यांचे फोटोदेखील फाडून टाकले. एकीकडे निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असतानाच आता कार्यकर्त्यांच्या रोषाला नेत्यांना सामोरे जावे लागत आहे.

Check Also

राज्यात पुनश्च लॉकडाऊन?

दोन दिवसांत निर्णय घेणार : मुख्यमंत्री मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply

Whatsapp