Sunday , April 11 2021

जातीय दंगा काबूविरोधी पथकाची रंगीत तालीम

पनवेल ः वार्ताहर

पनवेल तालुका पोलीस ठाण्याकडून नुकतीच जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम पोलीस उपायुक्त परिमंडळ 2चे शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शेडुंग टोल नाका येथे जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. दंगा काबू योजनेच्या रंगीत तालमीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, पोलीस निरीक्षक खेडकर यांच्यासह तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, 22 पोलीस अंमलदार तसेच नवीन पनवेल येथील अग्निशमन दलाचे एक अधिकारी व पाच फायरमॅन टेंडर व्हॅन, अ‍ॅम्ब्युलन्स तसेच झोन 2 स्ट्रायकिंगचे आठ पोलीस अंमलदार, नवीन पनवेल वाहतूक शाखेचा एक अधिकारी व सहा पोलीस अंमलदार उपस्थित होते.

Check Also

राज्यात पुनश्च लॉकडाऊन?

दोन दिवसांत निर्णय घेणार : मुख्यमंत्री मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply

Whatsapp