Sunday , April 11 2021

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी माधव पाटील यांची फेरनिवड

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांची सर्वानुमते फेरनिवड झाली आहे. मंचची वार्षिक सर्वसाधारण बैठक बुधवारी (दि. 24) झाली. या वेळी सन 2021-22करिता कार्यकारिणीची बिनविरोध निवड जाहीर झाली. त्यानुसार अध्यक्षपदी पाटील, सरचिटणीसपदी मंदार दोंदे, उपाध्यक्षपदी हरेश साठे, खजिनदारपदी नितीन कोळी, कार्यकारिणी सदस्य म्हणून अविनाश कोळी, विवेक पाटील, संजय कदम, प्रशांत शेडगे, अनिल भोळे, प्रवीण मोहोकर, राजू गाडे, दीपक घोसाळकर, तृप्ती पालकर, अनिल कुरघोडे यांची निवड झाली. या वेळी मनोगत व्यक्त करताना पाटील यांनी यापुढेही सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.

Check Also

राज्यात पुनश्च लॉकडाऊन?

दोन दिवसांत निर्णय घेणार : मुख्यमंत्री मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply

Whatsapp