Sunday , April 11 2021

इनरव्हील क्लबकडून सात वर्गखोल्यांचे सुशोभीकरण

पनवेल : रामप्रहर वृत्त

इनरव्हील क्लब बॉम्बे एअरपोर्ट, मिडवेस्ट आणि हार्बरसह इतर वेगवेगळ्या क्लबच्या वतीने युसूफ मेहेरअली सेंटर संचलित भानुबेन प्रवीण शहा माध्यमिक विद्यालयाच्या तारा येथील सात वर्गखोल्यांची दुरुस्ती व सुशोभीकरण इनरव्हीलच्या विविध क्लबकडून स्वखर्चाने करण्यात आले.

या वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थी प्रवेश कार्यक्रम नुकताच क्लबच्या डी. सी. प्रेसिडेंट आमला मेहता यांच्या हस्ते झाला. या वेळी युसूफ मेहेरअली सेंटरच्या अध्यक्ष उषा शहा, योगिनीबेन प्रवीण शहा, उपाध्यक्ष हरिश शहा, प्रकल्प संचालक सुरेश रासम, सोनल शहा यांच्यासह सर्व क्लबचे मेंबर्स, शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. युसूफ मेहेरअली सेंटर सन 1989पासून पनवेल तालुक्यातील कर्नाळा परिसरात असलेल्या आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विनाशुल्क मोफत शिक्षण देत आहे.

Check Also

राज्यात पुनश्च लॉकडाऊन?

दोन दिवसांत निर्णय घेणार : मुख्यमंत्री मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply

Whatsapp