Sunday , July 25 2021
Breaking News

खालापुरात हुक्का पार्टीवर पोलिसांची धाड

खोपोली ः प्रतिनिधी
कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वत्र नियमांची कडक अंमलबजावणी सुरू असताना शनिवारी (दि. 27)
रात्री खालापुरातील कलोते येथील कॅम्प मॅक्स फार्म हाऊसवर हुक्का पार्टी आणि डिजेवर धिंगाणा घालणार्‍या 14 जणांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कलोते हद्दीतील कॅम्प मॅक्स फार्म हाऊसवर परवानगी नसताना पार्टी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांना मिळाली होती.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री पावणेदहाच्या सुमारास तेथे छापा टाकला. या वेळी डिजेवर कर्णकर्कश संगीत आणि हुक्का पार्टी रंगात आली होती. पोलिसांनी कारवाई करीत फार्मचा व्यवस्थापक बिपिन राठोड (52, रा. दहिसर, मुंबई), हुसैन दिवासवाला (22, रा. मुंब्रा, ठाणे), अरुण तिवारी (32, रा. बदलापूर), जयेश तिवारी (35, रा. खालापूर), संदीप निंबेल (40, कलोते फार्म हाऊस), आदित्य मिश्रा (21, खारघर), नील जैन (रा. घाटकोपर, मुंबई), रित राजीव डे (21, रा. ठाणे), प्रवीण गोडेकर (42, रा. घणसोली), दिवास पाल (48, रा. अंबरनाथ), घनश्याम राय (27, रा. कलोते, मूळ बिहार), विनायक शिंदे (36, रा. कोल्हापूर), प्रफुल माथूरकर (39, रा.भानवज खोपोली) आणि श्रीकांत पाणीग्रही (27, रा. गोरेगाव) यांना ताब्यात घेतले. या वेळी पार्टीसाठी वापरण्यात येणारे डीजे आणि हुक्का साहित्यासह एक लाख 97 हजार 610 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.

Check Also

मॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य

पनवेल ः वार्ताहर कळंबोली येथील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट व्यवस्थापकाच्या मनमानीला कंटाळून येथील कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि. 23) …

Leave a Reply

Whatsapp