Friday , September 20 2019
Breaking News
Home / महत्वाच्या बातम्या / तीन लाखांहून अधिक दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

तीन लाखांहून अधिक दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

मुंबई : प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात तीन लाख नऊ हजार 233 दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे. या मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी अधिकाधिक सुविधा देण्यात येणार आहेत.

राज्यात अंध/अल्पदृष्टी असलेले 51 हजार 605 मतदार, मूकबधिर 35 हजार 887 मतदार, अस्थिव्यंग असलेले एकूण एक लाख 61 हजार 920 मतदार आणि अपंग म्हणून नावनोंदणी करण्यात आलेले 59 हजार 821 मतदार आहेत. अपंग मतदारांना मतदान केंद्रावर येण्यासाठी रँप, व्हीलचेअर आणि स्वयंसेवक यांची सोय करण्यात आली आहे. अंध आणि दुर्बल मतदारांना त्यांच्यासोबत सहकार्‍यास नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. अंध आणि अल्पदृष्टी असलेल्या मतदारांसाठी यंत्रावर ब्रेल लिपीची सुविधाही देण्यात येणार आहे. आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांची नोंदणी करून घेण्यात आली.

Check Also

गव्हाणच्या ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये शिक्षक-पालक मेळावा यशस्वी

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. …

Leave a Reply

Whatsapp