Sunday , April 11 2021

वाहतूक पोलिसांसाठी सलून सेवा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने उन्हातानात आपले कर्तव्य बजावणार्‍या व वाहतूक नियमन करणार्‍या वाहतूक पोलिसांसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सलून आपल्या दारी या उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात वाहतूक पोलिसांना जागेवर जाऊन सलून सेवा देण्यात आली. पनवेल, कळंबोली, तळोजा व गव्हाण फाटा या वाहतूक शाखेतील वाहतूक पोलिसांना सलून सेवा मोफत देण्यात आली. या उपक्रमाचे वाहतूक शाखेच्या अधिकार्‍यांकडून कौतुक करण्यात आले. या वेळी पनवेल शहाराध्यक्ष अनुराग वाघचौरे यांनी सेवा दिली. सोबत खांदा कॉलनी उपाध्यक्ष सदाशिव मोरे व ओमकार महाडिक उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून 70 विविध  सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांना सलून सेवा देण्यात आली.

Check Also

गरजवंताना मोफत रिक्षा सेवा सुरू

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply

Whatsapp