Sunday , April 11 2021

आरसीबीसाठी गुड न्यूज! देवदत्त पड्डीकल कोरोनामुक्त

मुंबई ः प्रतिनिधी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी)साठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा सलामीवीर फलंदाज देवदत्त पडिक्कल कोरोना चाचणीत निगेटिव्ह आला आहे. 22 मार्चला घेतलेल्या चाचणीत तो पॉझिटिव्ह आला होता.
बीसीसीआयच्या प्रोटोकॉलनुसार देवदत्तला कोरोनाची लागण झाल्यानंतर क्वारंटाइन करण्यात आले होते, परंतु आता तो संघात सहभागी होईल. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, देवदत्त 9 एप्रिल रोजी मुंबईविरुद्ध होणार्‍या पहिल्या सामन्यातही तो खेळू शकतो.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आपला पहिला सामना गतविजेत्या मुंबईविरुद्ध खेळणार आहे. गेल्या हंगामात देवदत्तने आयपीएल पदार्पण केले आणि सलामीसाठी फलंदाजी करताना त्याने जबरदस्त कामगिरी केली. मागील वर्षी देवदत्तने 15 सामन्यांत 5 अर्धशतकांसह 473 धावा केल्या. त्यामुळे तो या हंगामात पहिल्या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त राहिला, तर आरसीबीसाठी मोठा दिलासा असेल.

Check Also

राज्यात पुनश्च लॉकडाऊन?

दोन दिवसांत निर्णय घेणार : मुख्यमंत्री मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply

Whatsapp