Sunday , April 11 2021

आयपीएल फ्रँचायझींना दिलासा

मुंबईत खेळाडूंना सरावासाठी नाइट कर्फ्यूतून सूट

मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध जाहीर केल्यानंतर मुंबईतील आयपीएलच्या सामन्यांबाबत अनिश्चितता होती, पण मुंबईत दाखल झालेल्या आयपीएल फ्रँचायझींना सरकारने सूट दिली आहे. त्यांच्यासाठी रात्री 8नंतर लागू होणारे कलम 144 नसणार आहे. त्यामुळे ते उशिरापर्यंत सराव करू शकतात.
राज्यात 5 ते 30 एप्रिलपर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, प्रत्येक शनिवारी आणि रविवारी वीकेण्ड लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्य सरकारने त्या संदर्भातील नियमावलीही जाहीर केली आहे.
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्याने 9 एप्रिल रोजी आयपीएलला सुरुवात होणार आहे. मुंबईत 10 एप्रिलला पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. ’सामन्याची वेळ लक्षात घेऊन संघ दोन सत्रात सराव करीत आहेत. सायंकाळी 4 ते 6.30 आणि 7.30 ते 10 अशा या दोन सत्रांत खेळाडू सराव करणार आहेत,’ असे आप्तकालीन विभागाचे सचिव श्रीरंग घोलप यांनी बीसीसीआयला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
’रात्री 8 वाजल्यानंतर संघ व आयपीएल स्टाफना मैदानावर सराव करण्याची संधी देत आहोत. मैदान ते हॉटेल अशा प्रवासाचीही त्यांना परवानगी दिली जात आहे. त्यांनी बायो बबल व अन्य नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहेत,’ असेही त्या पत्रात नमूद केले आहे.

Check Also

राज्यात पुनश्च लॉकडाऊन?

दोन दिवसांत निर्णय घेणार : मुख्यमंत्री मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply

Whatsapp