Sunday , April 11 2021

आरसीबीचा दुसरा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

बंगळुरू ः वृत्तसंस्था

आयपीएलच्या 14व्या पर्वाला सुरूवात होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी)चा सलामीवीर देवदत्त पडिक्कल कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याचा दुसरा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो खेळू शकणार नाही. एक बाजू सावरत असल्याचे दिसताच आरसीबीच्या ताफ्यातील आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू डॅनिएल सॅम्स याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि तो आता आयसोलेशन मध्ये आहे. आरसीबीने ट्विट केले की, 3 एप्रिलला डॅनिएल सॅम्स चेन्नईच्या हॉटेलमध्ये आला तेव्हा त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होता. 7 दुसर्‍या कोरोना चाचणीचा रिपोर्ट 7 एप्रिलला हाती आला आणि तो पॉझिटिव्ह आढळला. त्याच्यात कोरोनाची कोणतीच लक्षणं दिसत नाहीत आणि त्याला आयसोलेशनमध्ये ठेवले गेले आहे. वैद्यकीय टीम त्याच्यावर लक्ष ठेऊन आहे.

Check Also

राज्यात पुनश्च लॉकडाऊन?

दोन दिवसांत निर्णय घेणार : मुख्यमंत्री मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply

Whatsapp