Sunday , April 11 2021

मुरूडमधील शिबिरात 153 जणांचे रक्तदान

मुरुड : प्रतिनिधी

राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. ते लक्षात घेवून येथील महादेव कोळी समाज, श्रीयश हॉस्पिटल व जिल्हा शासकीय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूडमध्ये बुधवारी (दि. 7) घेण्यात आलेल्या शिबिरात 153 जणांनी रक्तदान केले.

मुरूडमधील श्रीयश हॉस्पिटलमध्ये आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महादेव कोळी समाज अध्यक्ष मनोहर बैले यांच्या हस्ते करण्यात आले. ज्याप्रमाणे आपण रक्ताची नाती जपतो, त्याप्रमाणे रक्तदान करून रक्ताची नाती जोडू या, असे आवाहन माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश पाटील यांनी या  वेळी केले. तहसीलदार गमन गावीत यांनीही मनोगत व्यक्त केले.

महादेव कोळी समाज उपाध्यक्ष मनोहर मकु, डॉ. दीपक गोसावी, सुरेंद्र मकु, डॉ. संजय पाटील, डॉ. इप्सित पाटील, अरविंद गायकर, प्रकाश सरपाटील, महेंद्र पाटील, डॉ. आदित्य पाटील, चेतन मकु, गजानन पाटील, ऋत्विक मकु, डॉ. सुहासिनी चव्हाण, परिचारीका रुपाली बळी, सुशील ठाकूर, प्रल्हाद गोंजी, संदीप पांगे, जितेंद्र मकु या वेळी उपस्थित होते.

Check Also

राज्यात पुनश्च लॉकडाऊन?

दोन दिवसांत निर्णय घेणार : मुख्यमंत्री मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply

Whatsapp