Sunday , April 11 2021

नवीन पनवेलमध्ये बसविली पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन; सभापती सुशीला घरत यांचे प्रयत्न

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ’ड’च्या सभापती सुशिला जगदिश घरत यांच्या माध्यमातून नवीन पनवेल मधील सेक्टर 14 येथील ओम अपार्टमेंट ओनर्स असोसिशन ई-1 मधील बिल्डिंग क्रमांक 11, 12 व 13 मध्ये पिण्याच्या पाण्याची नवीन पाइपलाइन बसविण्याच्या कामाचे शुभारंभ करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करून झालेल्या या कार्यक्रमास प्रभाग समिती ’ड’च्या सभापती सुशिला जगदिश घरत, सोसायटी चेअरमन विश्वास पाटील, सचिव श्री. निंबाळकर, खजिनदार शिवाजी लाम, अनंता कोळी, भाई गरुडे, अमोल पाटील, संजय बोले, पंढरीनाथ म्हात्रे, लक्ष्मी छाथम आदी उपस्थित होते.  लोकप्रतिनिधी म्हणून सुशिला घरत यांच्या मार्फत नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे सातत्याने प्रयत्न होत असतात त्याचबरोबर अनेक विकासकामे सुरूच असतात. त्याच अनुषंगाने आणखी एका विकासकामाला येथे सुरुवात झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांकडून आमदार प्रशांत ठाकूर, प्रभाग समिती सभापती सुशील घरत यांचे आभार व्यक्त केले जात आहे.

Check Also

राज्यात पुनश्च लॉकडाऊन?

दोन दिवसांत निर्णय घेणार : मुख्यमंत्री मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply

Whatsapp