Tuesday , May 11 2021
Breaking News

बोरघाट खिंडीत ट्रक कोसळला

दोन ठार, एक जखमी; अडकलेल्या चालकाच्या सुटकेचा थरार

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने अनियंत्रित ट्रक डोंगराला धडकून खिंडीत कोसळल्याने दोन जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. 10) बोरघाटात घडली.

अडकलेल्या तिघांची सूटकेसाठी प्रयत्नाची शिकस्त बोरघाट वाहतुक पोलीस, अपघातग्रस्त मदत पथकाने केली, परंतु एकाला वाचविण्यात यश आले. शनिवारी दुपारी सव्वा दोन वाजणेचे सुमारास जुन्या मुंबई पूणे महामार्गावरून खोपोलीकडे येणार्‍या ट्रकचे अवघड वळणावर ब्रेक निकामी झाल्याने चालकाला ट्रक नियंत्रित करता आला नाही. ट्रकला डोंगराच्या कठड्याला धडकून खिंडीत कोसळला. ट्रकचा केबिनचा भाग दबला जावून ट्रकमध्ये असलेले तिघेजण अडकून बसले. ट्रकमधील भुसाशेणीचे ठोकळे सर्वत्र पसरले.

ट्रकमध्ये तिघेजण अडकल्याची माहिती बोरघाट वाहतुक पोलीस मदत केंद्राला मिळताच सपोनी जगदिश परदेशी पथकासह मदतीला पोहचले. अपघातग्रस्त मदत पथकाचे विजय भोसले, अमोल कदम यांनीदेखील मदतीसाठी धाव घेतली. ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाल्याने अडकून बसलेल्या तिघांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करण्यात आली. क्रेनच्या मदतीने  ट्रकचा काही भाग उचलून कसेबसे तिघांना बाहेर काढण्यात आले, परंतु दुर्देवाने ट्रकमधील अशोक तांभोळकर, भाऊसाहेब राठोड यांचा मृत्यू झाला, तर विजय जाधव (रा. ऊमरगा लातूर) गंभीर जखमी झाले. विजय जाधव यांना तातडीने उपचारासाठी पवना रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

Check Also

स्कूलबस मालक आणि चालकांवर उपासमारीची वेळ; शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी

रोहे : प्रतिनिधी कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा बंद असल्यामुळे रोह्यातील स्कूल बस मालक व …

Leave a Reply

Whatsapp