Tuesday , May 11 2021
Breaking News

महाड, खोपोलीसह रसायनीत लॉकडाऊनमुळे शांतता

महाड : प्रतिनिधी

कोरोना संक्रमण रोखएयासाठी पुकारण्यात आलेल्या वीकेण्ड लॉकडाऊनमुळे महाडमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता महाडमधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते. महाडमधील वाहतुक व्यवस्थादेखील पूर्ण बंद होती.

कोरोना महामारीची दुसरी लाट रोकण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. जनतेची साथ असतानाही अखेर या सरकारला लॉकडाऊनचा उपयोग करावा लागला आहे. गेल्या तीन दिवसांपासून महाडमधील बहुतांश दुकाने बंद होती, तसेच लॉकडाऊन बाबत लोकांमध्ये संभ्रम होता. हा संभ्रम दुर न करता सरकारने जबरन शनिवार रविवार हे विकेंड लॉकडाऊन लावल्याने गोरगरीबांनचे मोठे नुकसान झाले आहे. हातावर पोट असणार्‍यांवर उपासमारीची वेळ येणार असल्याने व्यापार्‍यांसह सर्वसामान्यांचा या लॉकडाऊनला विरोध आहे.

महाडमध्येदेखील मेडीकल, हॉस्पिटल, दुधविक्री केंद्र व भाजीविक्रेते वगळता सर्व दुकाने बंद होती. महाड एसटी आगारातील लोकल फेर्‍यादेखील शंभर टक्के बंद होत्या, तसेच विक्रम आणि ऑटो रिक्षादेखील बंद होत्या. शनिवार, रविवार पुरताच हा लॉकडाऊन असावा असे लोकांचे म्हणने असून सोमवारपासून सर्व व्यवहार सुरळीत होतील, अशी आशा व्यापारी वर्ग करीत आहे.

मोहोपाडा : प्रतिनिधी

वीकेण्ड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रसायनीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असून विनाकारण बाहेर फिरवणार्‍यावर कडक कारवाई करण्यात आली. रसायनी पोलीस स्टेशनच्या वतीने जागोजागी बंदोबस्त लावण्यात आला आहे. बाहेर फिरणार्‍या नागरिकांची कसून चौकशी व खात्री करून पुढे सोडण्यात येत होते.

नागरिकाने विना कारण बाहेर फिरू नये, नियमांचे पालन करावे, असे आवाहन रसायनी पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे. सर्वंच बंद असल्याने व कारवाईच्या भीतीने नागरिकांनी बाहेर न जात घरात राहणे पसंद केले.

दरम्यान, खालापूर तालुक्यातील वासांबे (मोहोपाडा) परिसरात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढता आहे. कोरोनाला रोखण्यासाठी रसायनी पोलीस स्टेशन आणि वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन केले जात आहे. रसायनी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आल्याने विनाकारण फिरणार्‍यांना जरब बसली आहे.

खोपोली : प्रतिनिधी

वीकेण्ड लॉकडाऊनमुळे खोपोली व परिसरात बाजारपेठेसह, रस्ते ओस पडलेले दिसले. शनिवार रविवार विकेन्ड लॉक डाऊन घोषित झाल्याने शनिवारी खोपोली व परिसरातील शंभर टक्के दुकान बंद होती, फक्त औषध दुकाने उघडी होती.

 प्रवासी नसल्याने रिक्षाही स्टॅण्डवर विश्रांती घेत होत्या. नेहमी गजबजलेल्या खोपोली गावातील बस आगर ही शांत व निर्मनुष्य होता.

मुंबईहून येणार्‍या ट्रेन वेळेवर येत होत्या, पण प्रवासीच नसल्यामुळे ट्रेन रिकाम्या धावत होत्या. खोपोली पोलिसांनी सर्व शहरात गस्त वाढवून चोख बंदोबस्त ठेवला होता. उपअधिक्षक संजय शुक्ला काला जाश्रतीने सर्व भागात फिरून बंदोबस्तावर असणार्‍या पोलिसांकडून माहिती घेत होते.

Check Also

स्कूलबस मालक आणि चालकांवर उपासमारीची वेळ; शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी

रोहे : प्रतिनिधी कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा बंद असल्यामुळे रोह्यातील स्कूल बस मालक व …

Leave a Reply

Whatsapp