Tuesday , May 11 2021
Breaking News

गोरगरीबांकडे लक्ष द्या, अन्यथा आंदोलन

संजयआप्पा ढवळेंचा ठाकरे सरकारला इशारा

माणगाव : प्रतिनिधी

वाढत्या कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन करणे हा पर्याय नाही. लॉकडाऊनमुळे छोटे दुकानदार व रोजंदारीवर काम करणारे कामगार अशा गोरगरीब सामान्य जनतेचे पुरते हाल होत आहेत. याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे, अन्यता लवकरच राज्य सरकारविरोधात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर  यांच्या नेतृत्वाखाली माणगावात मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी दिला आहे.

भाजप तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी पुढे असे सांगितले की, कोरोनावर मात करण्याची जबाबदारी सर्वांची आहे.प्रत्येकांनी यासाठी काळजी घेतली पाहिजे. पण लॉकडाऊन हा त्याला पर्याय नाही. गेल्यावर्षीही वेळोवेळी लॉकडाऊन करण्यात आले पण कोरोना थांबला नाही.

सन 2021 मध्येही कोरोनाने शिरकाव केलाच आहे. आता नागरिकांनी कोरोनासोबत जगायचे ठरवले आहे. लॉकडाऊन हा श्रीमंतांना काही वाटत नाही, पण दुकानदार व रोजंदारीवर काम करणार्‍या नागरिकांना किंवा भाड्याने दुकानाची जागा घेणार्‍या दुकानदारांना मानसिक त्रास देणारा आहे.

याकडे राज्य सरकारने गांभीर्यपूर्वक लक्ष देणे जरुरीचे आहे.अन्यथा भाजपतर्फे गरीब जनतेचा विचार करून माणगावात मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी दिला आहे.

Check Also

स्कूलबस मालक आणि चालकांवर उपासमारीची वेळ; शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी

रोहे : प्रतिनिधी कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा बंद असल्यामुळे रोह्यातील स्कूल बस मालक व …

Leave a Reply

Whatsapp